VIDEO : आचरा निवडणूक : भाजपा पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचारार्थ बाजारपेठेत रॅली

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित ; अशोक सावंत यांच्याकडूनही आढावा

मालवण | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला असून भाजप, शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस तसेच सदस्य पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आचरा बाजारपेठेत प्रचार फेरी काढण्यात आली.

या रॅलीत भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती नीलिमा सावंत, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संतोष गांवकर, संतोष कोदे, राजन पांगे, महेश मांजरेकर, दीपक सुर्वे, प्रफुल्ल प्रभू, सचिन हडकर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, अभिजित सावंत, रुपेश हडकर, बाबू कदम तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनीही याठिकाणी उपस्थिती दर्शवत निवडणुकीचा आढावा घेतला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!