मालवणमधील आभा कार्ड नोंदणी व आधारकार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने भाजपा कार्यालयात आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावतीने येथील भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी, आधार कार्ड दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, अशोक तोडणकर, जगदीश गावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, आबा हडकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.