आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद…
भाजपा नेते दत्ता सामंत यांसह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ ; शिबिरात मोफत रक्त, डोळे तपासणी बरोबरच आभा कार्ड, आधारकार्ड अपडेट
२० ऑक्टोबर पर्यंत प्रभागात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन ; नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपाचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे मित्रमंडळाच्या वतीने शहरातील भरड – वायरी, देऊळवाडा परिसरात मोफत रक्त तपासणी, डोळे तपासणी तसेच आभा कार्ड नोंदणी, आधारकार्ड अपडेट शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भरड वायरी परिसरातील नागरिकांसाठी शैलेश लुडबे यांच्या निवासस्थानी आयोजित शिबिराचा शुभारंभ झाला. सुमारे २२५ हून अधिक जणांनी याचा लाभ घेतला. उद्या (मंगळवारी) याच ठिकाणी पुन्हा हे शिबीर होणार आहे.
१८ ऑक्टोबर रोजी देऊळवाडा नारायण मंदिर नजिक यशवंत गावकर यांच्या निवासस्थानी तर २० ऑक्टोबर रोजी वायरी लुडबेवाडी येथे आप्पा लुडबे यांच्या निवासस्थानी हे शिबीर होणार असून या शिबिरांचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आप्पा लुडबे यांनी केले आहे.
दरम्यान, वायरी लायब्ररी शाळेजवळ आयोजित शिबिराचा शुभारंभ दत्ता सामंत यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, आबा हडकर, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, राजू बिडये, आप्पा लुडबे यांच्यासह शैलेश लुडबे, शफाकत खान, बाबा शेख, संजय पाताडे, दीपक कुडाळकर, ललित तळवडेकर, युसूफ खान, मंथन सुतार, भाई लुडबे, गोविंद गावकर, अतुल हडकर, सागर चव्हाण, तुषार गावकर, कविता तारी आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.