मालवण भाजपा कार्यालयात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस साजरा

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणाऱ्या माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा वाढदिवस शुक्रवारी येथील भाजपा कार्यालयात भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यामध्ये माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, सूर्यकांत फणसेकर, बाळू तारी, विलास मुणगेकर, राजू बिडये, भाई मांजरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निकित वराडकर, निनाद बादेकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!