आचऱ्यात ठाकरे गटाला धक्का ; माजी उपसरपंचाचा भाजपात प्रवेश

भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील सर्वात मोठ्या आचरा ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला धक्का दिला आहे. आचरा ग्रा. प. चे माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर आणि सौ. वायंगणकर यांनी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, माजी जि. प. सदस्य जेरॉन फर्नांडिस, संतोष कोदे, संतोष गावकर, अवधूत हळदणकर, मंगेश गावकर, सचिन हडकर यांच्यासह भाजपाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!