नगरवाचन मंदिरच्या वतीने मालवणात १५ व १७ ऑक्टोबर रोजी ग्रंथ प्रदर्शन
मालवण : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त नगरवाचन मंदिर मालवणच्या वतीने ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून संस्थेच्या स्व. वसंतराव डावखरे स्पर्धा परिक्षा विभाग (ई लायब्ररी) करिता देणगी दाखल दिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन तसेच अच्युत गोडबोले यांच्या विविध विषयावरील ग्रंस्थांचे प्रदर्शन १५ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस सकाळी ९ ते १ व सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत वाचकांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आलेले आहे. याचा मालवण शहरातील वाचकानी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी संस्थेच्यावतीने केले आहे.