मालवण – कुडाळात “विकासपर्व” ; निलेश राणेंच्या प्रयत्नांतून किर्लोस-गोठणे ब्रिजसाठी २७. ५० कोटींचा निधी

नाबार्ड अंतर्गत केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ, मालवण मतदार संघात भाजपचे नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून विकास पर्व कायम आहे. बऱ्याच वर्षांची मागणी असलेल्या तसेच कणकवली व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या किर्लोस चव्हाणवाडी ते गोठणेमाळ होडीचे साने ग्रा. मा. ४५८ या रस्त्यावरील ब्रिजसाठी नाबार्ड अंतर्गत २७ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे.

यामुळे किर्लोस ते गोठणे पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रवास करणे सोयीचे होणार आहे. किर्लोस व गोठणे रामगड पंचक्रोशीतील नागरिकांकडून अनेक वर्षापासून या ब्रिजसाठी मागणी होत होती. किर्लोस ग्रामस्थांनी भाजपा नेते निलेश निलेश राणे यांचे या विषयावर लक्ष वेधल्यानंतर निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून किर्लोस चव्हाणवाडी ते गोठनेमाळ मार्गे होडीचे साने ग्रा. मा. 458 किमी. 0/100 येथे नवीन पूल बांधणे या कामासाठी सत्तावीस कोटी पन्नास लक्ष एवढ्या निधीची मागणी केली होती, त्यानुसार निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. किर्लोस-गोठणे ब्रिजसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण घाडीगांवकर, सामाजिक कार्यकर्ते दिपक जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणेश ऊर्फ गजू बाक्रे, बाळा ऊर्फ अर्जुन लाड, सतीश नलावडे, प्रकाश भावे, भाजपचे सोशल मीडिया मालवण तालुका संयोजक शुभम बाक्रे तसेच भाजप युवा मोर्चाचे अभिमन्यू लाड, विनोद भावे, गोठणे सरपंच सौ. दीप्ती हाटले यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!