ॲड. सुमित जाधव यांचा संविधान रत्न पुरस्काराने सन्मान

मालवण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मालवण वायरी येथील ॲड. सुमित जाधव यांचा संविधान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यावर्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकीलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे १२५ वे जन्मवर्ष साजरी करीत आहेत. या निमित्ताने ॲड. जाधव यांचा सन्मान करण्यात आला. भेगडे लॉन्स, वडगाव मावळ येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल ॲड. सुमित जाधव यांचे अभिनंदन होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!