रेवतळे येथे गणेश विसर्जन ठिकाणी स्वखर्चाने काँक्रिटीकरण करणार !
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांचा स्थानिकांना शब्द
रेवतळे मधील स्थानिक नागरिकांनी केली होती मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्गा नजिक गणेश विसर्जन स्थळानजिक विसर्जनावेळी गैरसोय होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत
यांनी स्वखर्चाने याठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण करून देण्याचे आश्वासन दिले आहे. श्री. सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली.
रेवतळे येथील सदा मडये, समीर मडये, विद्याधर मडये, अमेय बादेकर, निनाद बादेकर यांनी रेवतळे सागरी महामार्ग आडारी सातेरी मांड जाणाऱ्या पूला ठिकाणी गणेश विसर्जन दरम्यान येणाऱ्या समस्या दूर करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान भाविकांना गणेश विसर्जन सुलभ व्हावे, यासाठी या ठिकाणी सिमेंट काँक्रिट पद्धतीने प्लॅटफॉर्म उभारणी करून देण्याची ग्वाही दिली आहे. या प्लॅटफॉर्म उभारणी नंतर पुढील वर्षी गणपती बाप्पांचे विसर्जन नागरिकांना याठिकाणी करणे सुलभ होणार आहे.
यावेळी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, पंकज पेडणेकर यांसह मुन्ना फाटक, विष्णू भोजने, राजन भोजने, विजय फाटक, सचिन मडये, सिद्धेश मडये, आकाश मडये, गौरव सारंग, प्रणय माळकर, बाबु टेमकर, लीलाधर मडये, संकेत वाईरकर, सिद्धेश पाटकर, संदीप मडये, राजा मांजरेकर, नितीन हडकर, सचिन हडकर, शुभम लुडबे, बाबु शिंदे आदी उपस्थित होते.