उद्यापासून शाळा सुरू ; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मालवणात पालिकेकडून खबरदारी !
शहरातील शाळा सॅनिटाईज ; प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन
मालवण : कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्याने शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरी भागात ८ वी ते १२ वी तर ग्रामीण भागात ५ वी ते १२ वी वर्ग सोमवारी ४ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील शाळा सॅनिटाईज करण्याच्या सूचना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी प्रशासनास दिल्या. त्यानुसार
मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या सर्व शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे शाळा प्रशासनाने तंतोतंत पालन करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.