मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत लीना ओश्रामकर प्रथम

तनिष्का आचरेकर द्वितीय तर अनिता मयेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

अरविंद मोंडकर आणि सहकाऱ्यांकडून संस्कृती व वारसा जपण्याचं कार्य ; भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून कौतुक

मालवण | कुणाल मांजरेकर

नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळाच्या वतीने मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धेत लीना ओश्रामकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर तनिष्का आचरेकर द्वितीय तर अनिता मयेकर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

या स्पर्धेचे यंदा आठवे वर्षं होते. स्पर्धेचे उदघाटन भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी, माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन पाटबंधारे माजी उपाध्यक्ष साईनाथ चव्हाण, संदेश पारकर, दत्ता सामंत, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, हरी खोबरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, उमेश नेरुरकर, महेश कांदळगावकर, बाळु अंधारी, ऍड, अमृता मोंडकर, गणेश पाडगावकर, देवानंद लुडबे, योगेश्वर कुर्ले, स्नेहल मेथर, संदेश कोयंडे, जेम्स फर्नांडिस, पल्लवी तारी खानोलकर, दीपा शिंदे, पूजा करलकर, शुभदा पाडगावकर, ममता तळगावकर, हर्षदा पाटील, लक्ष्मीकांत परुळेकर, मोहन वराडकर, महेश जावकर, सौरभ ताम्हणकर, राजा गावकर, बबन शिंदे, प्रीतम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम क्रमांक प्राप्त लीना ओश्रामकर यांना पैठणी, सोन्याची नथसोबत १० लाखाचा विमा, द्वितीय क्रमांक प्राप्त तनिष्का आचरेकर यांना पैठणी व सोन्याची नथ सोबत १० लाखाचा विमा तृतीय क्रमांक प्राप्त अनिता मयेकरयांना पैठणी व चांदीची पैंजण देण्यात आली. स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक इश्वरी जोशी हिस पैठणी, मोबाईल देण्यात आला. स्पर्धेत सहभाग, पाहण्यासाठी आलेल्या महिला भगिनींना सामाजिक संदेश असलेली कुपन देण्यात आली। यामधून सिद्धि आत्माराम ढोलम यांस चांदीचा छल्ला लकी ड्रॉ द्वारे देण्यात आला. स्पर्धकांना आयोजकांकडून नारळ मोफत देण्यात आले. सूत्रसंचालन अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले.

मोंडकर आणि सहकाऱ्यांकडून संस्कृती व वारसा जपण्याचं कार्य : निलेश राणे

स्पर्धेचे उदघाटक भाजपचे नेते निलेश राणे यांनी अरविंद मोंडकर अध्यक्ष असलेल्या मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळ या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. राजकारणात काम करताना असा मनाचा मोठेपणा क्वचितच पाहायला मिळतो. मोंडकर यांनी आपल्या स्पर्धेच्या उदघाट्नाचे मला निमंत्रण देताना आपण कुठल्या पक्षात आहोत, आणि मी कुठल्या पक्षात आहे, हे बघितलं नाही. खऱ्या अर्थाने मालवणी संस्कृती आणि वारसा जपण्याचे काम ते करीत आहेत. ही मानसिकता प्रत्येकाने जपली पाहिजे, असे निलेश राणे म्हणाले. तर भाजपा नेते दत्ता सामंत यांनीही कोणताही द्वेष मनात न ठेवता खुल्या दिलाने सामाजिक बांधिलकी जोपासत अरविंद मोंडकर राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सुदेश आचरेकर यांनीही यावेळी विचार मांडले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!