शिल्पा खोत मित्रमंडळ आयोजित महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेची राज्यभर लोकप्रियता ; राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग

मुंबईच्या नंदिनी परब ठरल्या स्पर्धेच्या महाविजेत्या तर कस्तुरी राऊळ उपविजेत्या

भार्वी शिर्सेकर तृतीय तर रोसेस लुद्रीक चतुर्थ ; विजेत्यांवर सोन्या, चांदीच्या बक्षिसांचा वर्षाव

मालवण | कुणाल मांजरेकर

सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ आणि सहकारी यांच्या वतीने कोकण प्रांतात सर्वाधिक लक्षवेधी ठरणारी महिला सहभागातील नारळ लढवणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाची स्पर्धा नारळी पोर्णिमेचे औचित्य साधून मालवण बंदर जेटी येथे रेकॉर्ड ब्रेक प्रतिसादात संपन्न झाली. राज्यभरातील निमंत्रित स्पर्धक व जिल्ह्यातील विविध प्रांतातील बहुसंख्य सहभागी स्पर्धक यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात व हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीने तसेच स्वराज्य ढोल ताशा पथकाच्या साथीने उत्तरोत्तर रंगत वाढत गेलेल्या या स्पर्धेच्या मानकरी (महाविजेत्या) ठरल्या मुंबईच्या नंदिनी परब ! त्यांना मानाचा सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ यांनी मढवलेली दिमाखदार ट्रॉफी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर तसेच मान्यवर व आयोजकांच्या वतीने सुपूर्द करण्यात आली.

स्पर्धेत कस्तुरी राऊळ या उपविजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याचा कॉइन, सोन्याची नथ यांनी मढवलेली ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांक प्राप्त भार्वी शिर्सेकर व चतुर्थ क्रमांक प्राप्त रोसेस लुद्रीक यांना सोन्याची नथ देऊन मान्यवर व आयोजक टीमच्या वतीने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे खास आकर्षण सोन्या चांदीचा नारळ व त्यासोबत ट्रॉफी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यासह स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत पोहचलेल्या दहा स्पर्धकांना चांदीची नाणी देत सन्मानित करण्यात आले. तसेच आयसीआयसीआय प्रुडेनशीयल व शिल्पा खोत मित्रमंडळ वतीने लकी ड्रॉ स्वरूपात वीस जणांचा गौरविण्यात आले.

यावर्षी स्पर्धेचे नववे वर्ष होते. मालवण बंदर जेटी येथे दर्याराजाच्या साक्षीने रंगलेल्या या स्पर्धेच्या सर्वोत्तम आयोजनचे सर्वांनी उत्स्फूर्तपणे कौतुक केले. सौ. शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतील व नेत्रदीपक आयोजनातील ही स्पर्धा सिंधुदुर्ग नव्हे तर कोकण प्रांताचा ब्रँड ठरली आहे. असे कौतुकोद्गार उपस्थितांनी व्यक्त केले. महिलांना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने सामाजिक सेवाकार्यात व्यस्त असणाऱ्या सौ. शिल्पा खोत यांचे विशेष कौतुक उपस्थित महिला व मान्यवर यांनी केले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, सांगली महानगरपालिका नगरसेवक निरंजन आवटी, महेश जावकर, बाबी जोगी, मंदार ओरसकर, संमेश परब, उद्योजक राजन आंगणे, उमेश नेरुरकर, अमेय पै, जॉन नरोना, परशुराम पाटकर, देवदत्त हडकर, डॉ. शिल्पा झाटये, एपीआय सुप्रिया बंगडे, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, वैशाली शंकरदास, स्मृती कांदळकर, सिया धुरी, गीतांजली आचरा, अनुष्का चव्हाण, श्रद्धा वेंगुर्लेकर, मेघना कांबळी, निकिता बागवे, सुहास वालावलकर, बंड्या सरमळकर, सचिन ओटवणेकर, प्रतिभा चव्हाण, नंदा सारंग, रूपा कुडाळकर, काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी, पल्लवी तरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, वेंगुर्ला येथील सरपंच सुमेधा तेंडुलकर, अभय कदम, उमेश चव्हाण, प्रवीण रेवणकर, बाबा मडये, करण खडपे, प्रवीण रेवंडकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर, अंकिता मयेकर, मनस्वी कदम, वझे काकी, चारुशीला आढाव, शांती तोंडवळकर, निनाक्षी शिंदे, दिव्या परब, अनुष्का चव्हाण, गीता आचरेकर, भारती आडकर, अनंत पाटकर, दिलीप पवार, अमन यासह निवेदक बादल चौधरी, अक्षय सातार्डेकर यासह अनेक मान्यवर, सहकारी मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी मत्स्य व्यावसायिक दीक्षा ढोके, सिडनी विद्यापीठात भारताचे प्रतिनिधित्व करणारी मानसी डीचोलकर, नृत्य बाल कलाकार रेवा जोशी, मातृत्व आधार फाउंडेशन, व्यापारी संघ, रक्तदाते, युट्युबर वन्य सामाजिक सेवाकार्य व्यक्ती यांचा सन्मान शिल्पा खोत, यतीन खोत यांच्या वतीने करण्यात आला. पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी आगाऊ नाव नोंदणीही अनेक उपस्थित स्पर्धकांनी केली. तर कोल्हापूर, मुंबई येथील निमंत्रित स्पर्धकांनी पुढील वर्षी खुल्या राज्यस्तरीय स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन करावे असे आयोजकांना सांगितले. यावरून या स्पर्धेची वाढती लोकप्रियता स्पष्ट होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!