पेंडुर जि. प. विभागात युवासेना व शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

युवासेना पेंडुर विभागप्रमुखपदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुखपदी गणेश गाड , उपशाखाप्रमुखपदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुखपदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ, युवासेना कट्टा शाखाप्रमुखपदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे, युवासेना पेंडूर शाखाप्रमुखपदी संदीप सावंत आदींच्या नियुक्त्या

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पेंडूर विभागात मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. विभागात शिवसेना ठाकरे गट आणि युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये युवासेना पेंडुर विभागप्रमुखपदी वंदेश ढोलम, शिवसेना कट्टा शाखाप्रमुखपदी गणेश गाड, उपशाखाप्रमुख पदी हर्षद मोरजकर, शिवसेना काळसे शाखाप्रमुखपदी चंद्रकांत उर्फ पप्या राऊळ, युवासेना कट्टा शाखाप्रमुखपदी भूषण ढोलम, सिद्धार्थ हिरवे, युवासेना पेंडूर शाखाप्रमुखपदी संदीप सावंत आदींच्या सर्वानुमते नियुक्त्या करण्यात आल्या.

कट्टा बाजारपेठ येथे शिवसेना ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले आणि सूचना व अडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, युवासेना समन्वयक मंदार ओरासकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, अक्षय रेवंडकर, महिला विभागप्रमुख लता खोत, विभागप्रमुख कमलाकर गावडे, उपविभागप्रमुख उमेश प्रभू आणि शिशुपाल राणे, दर्शन म्हाडगुत, बाबू टेंबुलकर, वंदेश ढोलम, देवदास रेवडेकर, शेखर रेवडेकर, संदीप सावंत, गणेश गाड, हर्षद मोरजकर, जगदीश मोरजकर, राजु परब, प्रसाद दळवी, बाळा पेडणेकर, किशोर भगत, विजय धामापुरकर, भिवा तळगावकर यांसह विभागातील सर्व शाखाप्रमुख आणि शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!