शिवसेना मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अमोल वस्त यांची निवड

उपाध्यक्षपदी सिया धुरी तर सचिवपदी अविराज परब यांची नियुक्ती ; आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्त्या

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी रेवंडी सरपंच अमोल वस्त यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी कोळंब सरपंच सिया धुरी तर सचिव पदी पळसंब उपसरपंच अविराज परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आ. नाईक यांनी सर्व सरपंच व उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मालवण तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व सरपंच व उपसरपंच यांची बैठक येथील लीलांजली हॉल येथे गुरुवारी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ लोकांना कसा मिळवून द्यावा, नागरिकांची छोटी मोठी कामे कशाप्रकारे मार्गी लावावीत याचे मार्गदर्शन यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थितांना केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुक्यातील नवीन सरपंच उपसरपंच संघटनेची स्थापना करण्यात आली.

याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, मंदार केणी, दीपा शिंदे, श्वेता सावंत, अरुण लाड, प्रशांत सावंत, महेश जावकर, बाबी जोगी, नंदू गावडे, कमलाकर गावडे, शिल्पा खोत, बंडू सावंत, बंडू चव्हाण, संतोष घाडी, समीर लब्दे, तपस्वी मयेकर, सचिन पाटकर, विजय पालव, राजेश गावकर, चंदू गोलतकर, संदीप हडकर, लीलाधर पराडकर, दिव्या धुरी, नेहा तोंडवळकर, नम्रता मुद्राळे, हर्षद पाटील, दिनेश परब, अनंत पोईपकर, संतोष पेडणेकर, रणजित परब, दिव्या बागवे, रंजना पडवळ, संतोष पडवळ, लता खोत, श्रद्धा वेंगुर्लेकर, रवींद्र साळकर, अजित लाड, देवेंद्र पुजारे, बाळकृष्ण सावंत, स्वप्नील पुजारे, शामा वाक्कर, संदीप आडवलकर, दुलाजी परब, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, राजू मेस्त्री, सचिन मालवणकर, किशोर कासले, भाऊ चव्हाण, अजिंक्य परब, विशाल धुरी, भगवान लुडबे, विजय नेमळेकर, बंड्या सरमळकर, यशवंत गावकर, दीपक किर्लोस्कर, उमेश चव्हाण, वासू गावकर आदी शिवसेना सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!