शिवसेना (ठाकरे गट) सरपंच, उपसरपंचांची गुरुवारी मालवणात बैठक

आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती ; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुधवारी मालवणात आयोजित करण्यात आलेली सरपंच, उपसरपंच बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. ही बैठक गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लीलांजली हॉल मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.

आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून या बैठकीस उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, निमंत्रित सदस्य, महीला पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!