देवेंद्र प्रबोधनमालेचा उद्या कुडाळमध्ये “कृष्णार्जुन युद्ध” व्याख्यानाने शुभारंभ…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजन

कुडाळ : भाजपाचे कुडाळ – मालवण विधानसभेचे प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्यावतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुडाळ आणि मालवण तालुक्यात विविध ठिकाणी वर्षभर दर महिन्याच्या २२ तारखेला प्रबोधन करणारी कीर्तने, व्याख्याने, प्रवचन आयोजित करण्यात येणार आहेत. यानिमित्त मंगळवार दि.२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वा. भाजपा कार्यालय, कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाच्या मंडपात ‘देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती’ या उक्तीने भारावलेल्या देवेंद्र प्रबोधमालेतील धर्मारक्षणार्थ पहिले पुष्प ‘कृष्णार्जून युद्ध’ या कथानकाच्या रूपाने कीर्तनकार ह.भ.प.प्रशांत धोंड व सहकारी सादर करणार आहेत.

विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्यासाठी मार्गदर्शन करणारी तसेच तरुणांना रोजगार विषयक मार्गदर्शन करणारी अभ्यासक, तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने या प्रबोधनमालेत आयोजित करण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल आणि संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!