स्वराज्य ढोलपथका मार्फत मालवणात विनामूल्य ढोलवादन प्रशिक्षण

महिलांबरोबरच पुरुषांनाही संधी ; इच्छूकांनी संपर्क साधण्याचे सौ. शिल्पा यतीन खोत यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणसह संपूर्ण जिल्ह्यात नावाजलेल्या स्वराज्य ढोल पथका मार्फत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मालवणात विनामूल्य ढोल वादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी महिलांबरोबरच पुरुषांनाही ढोल वादन शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती स्वराज्य ढोल पथकाच्या सर्वेसर्वा सौ. शिल्पा यतीन खोत यांनी दिली आहे.

स्वराज्य ढोल पथकाचा जिल्ह्यात नावलौकिक आहे. अनेक महिलांना या ढोल पथकामार्फत स्वावलंबनाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला आणि पुरुषांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय स्वराज्य ढोल पथकाने घेतला आहे. तरी इच्छूकांनी सौ. शिल्पा खोत 8390103330, निकिता तोडणकर 7588472876 किंवा ज्योती तोडणकर 8956036393 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सौ. शिल्पा खोत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!