मनसेचे माजी तालुका उपाध्यक्ष उदय गावडे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश

मालवण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी उपतालुकाअध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी गुरुवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्याहस्ते हा पक्षप्रवेश संपन्न झाला.

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, महिला उप तालुकाप्रमुख भारती घारकर, उप तालुकाप्रमुख पराग खोत, विधानसभा क्षेत्र प्रमुख कणकवली जिल्हा परिषद तालुकाप्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख उदय राऊत, शिवसैनिक अच्युत लोके, सुधीर चिंदरकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, दीपक राऊत यासह अन्य उपस्थित होते.

उदय गावडे यांनी दोन दिवसांपूर्वी साळेल गावातील विविध प्रश्नी मालवण तहसील कार्यालय समोर उपोषण केले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी भेट दिली. मंत्री दीपक केसरकर यांनी याप्रश्नी अधिकारी यांना सूचना केल्यानंतर अधिकारी वर्गाच्या आश्वासन नंतर गावडे यांनी उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर आता उदय गावडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!