मालवण बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करा…

आ. वैभव नाईक यांच्या एसटी विभाग नियंत्रकांना सूचना ; नूतन इमारतीच्या कामाची पाहणी

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेत इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आ. नाईक यांनी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना केली आहे.

आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मालवण एसटी बस स्थानकासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानुसार हे काम सुरु आहे. मालवण एसटी बस स्थानकामध्ये सिनेमागृह प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात सिनेमागृहाचे काम मंजूर करून लवकरात लवकर त्याची टेंडर प्रक्रिया केली जाईल असे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर लोकांच्या मागणीनुसार ज्या ठिकणी नवीन एसटी फेऱ्या सुरू करणे आवश्यक आहे, तसेच बंद असलेल्या एसटी फेऱ्या पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे, त्याठिकाणी एसटी फेऱ्या सुरू कराव्यात अशाही सुचना आ. वैभव नाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी एसटी स्टँड मधील विद्यार्थी व नागरिकांशी आ.वैभव नाईक यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केकरे, आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, एसटी स्थानक प्रमुख सतीश वाळके आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!