मसुरेत महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा थरार…

समिक्षा बागवे प्रथम तर अंकिता मेस्त्री द्वितीय क्रमांकाच्या मानकरी

शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना मसुरे, पोईप विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिलांकरिता नारळ लढविण्याच्या स्पर्धेत शेकडोंच्या संख्येने महिलांनी सहभागी होऊन स्पर्धेचा आनंद लुटला. स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी महिलांचे नारळ फोडून समीक्षा बागवे यांनी प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस मिळविले. तर अंकिता मेस्त्री यांनी स्पर्धेचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विजेत्या महिलांना मालवण तालुकाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, कुडाळ मालवण युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत, आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, सेजल परब, सरपंच सुरेखा वायंगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, राजेश गावकर, दिपा शिंदे, निनाक्षी मेथर, राघवेंद्र मुळीक, मनीषा बागवे, चंद्रकांत राणे, हिना कांदळकर, आर्या गावकर, सुर्वी लोणे, पायल आढाव, घाडीगावकर आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

हरी खोबरेकर यांनी आपल्या मनोगतामधून ग्रामीण भागातील महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतल्याबद्धल शिवसेना मसुरे विभाग व अनंत पाटकर मित्रमंडळाचे कौतुक केले. तसेच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मसुरे विभागामध्ये केलेल्या विकासामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती दर्शविली असल्याचे स्पष्ट केले. मसुरे विभागाच्या विकासाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर शिल्पा खोत यांनी आपल्या मनोगतामधून महिलांनी शारीरिक, मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी अशाप्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन रोजच्या धकाधुकीच्या आयुष्यामधून थोडा विरंगुळा करावा. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती असल्याने अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर सेजल परब यांनी देखील आपल्या मनोगतामधून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता प्राजक्ता परब, आदिती मेस्त्री, स्वरा परब, प्रज्ञा बागवे, समिक्षा बागवे, समिक्षा परब, नम्रता बागवे, पप्पू परब, सचिन परब, संतोष परब, अमोल परब, समीर परब, किशोर परब यांनी सहकार्य केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!