महेश राणे : मालवणच्या राजकीय पटलावरील स्वच्छ व निर्मळ चेहरा….
शिवसेना मालवण तालुकाप्रमुख महेश राणे वाढदिवस विशेष
कुणाल मांजरेकर
२०२२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा घेऊन जाणारे ठरले. प्रखर हिंदुत्वाचा वसा घेऊन शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी मध्ये घुसमट होत असल्याने एकनाथ शिंदे यांनी उठाव करीत भाजपा सोबत येत शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. या राजकीय उठावात काही नवीन चेहऱ्यांना राजकीय पटलावर संधी मिळाली. यातीलच एक नाव म्हणजे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख महेश मधुकर राणे…. राजकारणातील स्वच्छ आणि निर्मळ चेहरा म्हणून ओळख असलेल्या महेश राणे यांचा आज ९ ऑगस्ट रोजी ४३ वा वाढदिवस… यानिमित्ताने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा…
महेश मधुकर राणे यांचा जन्म ९ ऑगस्ट १९८० रोजी मालवण तालुक्यातील असरोंडी गावात झाला. त्यांचे वडील मधुकर महादेव राणे हे शेतकरी कुटुंबातील तर आई श्रीमती भागीरथी ही गृहिणी. महेश राणे यांचे शिक्षण असरोंडी आणि कणकवलीत झाले. शिक्षणानंतर नोकरी निमित्ताने त्यांनी मुंबई गाठली. मात्र नोकरीत त्यांचे मन फार काळ रमले नाही. दोन तीन वर्षात त्यांनी पुन्हा गावचा रस्ता धरला. इकडे येऊन त्यांनी व्यवसायात शिरकाव केला. हॉटेल इंडस्ट्रिज मध्ये त्यांना अपेक्षित यश मिळाले. आचरा येथे “राणेशाही” रेस्टोरंट त्यांनी सुरु केले. या दरम्यानच्या काळात तत्कालीन शिवसेना नेते, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच भैय्याशेठ सामंत यांच्या ते संपर्कात आले. यानंतर् शिवसेनेमधील राजकीय उठवानंतर शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदी त्यांची वर्णी लावण्यात आली. मालवण तालुक्यात शिवसेनेची पुनर्रचना करण्या साठी आज ते मेहनत घेत आहेत. पत्नी सौ. मनाली, मुलगा वेदांत असा त्यांचा परिवार आहे. आपल्या राजकीय आणि समाजिक जीवनातील वाटचालीत कुटुंबाची फार मोठी साथ लाभल्याचे ते अभिमानाने सांगतात. महेश राणे यांचा आज ४३ वा वाढदिवस… त्यानिमित्ताने त्यांना राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचालीसाठी आमच्या लाख लाख शुभेच्छा….