धुरीवाड्यातील मोफत आयुषमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, महेश सारंग यांच्यावतीने आयोजन
मालवण | कुणाल मांजरेकर
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण आणि महेश सारंग यांच्यावतीने धुरीवाडा येथील राजू बिड्ये यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्मान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ९० हून अधिक जणांनी नोंदणी केली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने वॉर्ड क्र. १ आणि २ च्या लाभार्थ्यांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपा नेते दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आपा दत्ता, मोहन वराडकर, विलास मुणगेकर, मंदार दत्ता, भाई मांजरेकर, कमलेश कोचरेकर, वसंत गावकर, दत्तात्रय केळुसकर, दिलीप हडकर, महेश सारंग, राजू बिडये, बाप्पा तळाशिलकर, ललित चव्हाण, गणेश परब , बाळा जाधव, निनाद बादेकर , बाबू शिंदे, राज कांदळकर, परेश केळूसकर, आनंद तळाशिलकर आदी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाकडून आरोग्य मित्र दशरथ अनिरुद्ध गोसावी आणि बाबू रामचंद्र हरमलकर यांनी काम पाहिले.