यतीन खोत यांच्या निवासस्थानी आयोजित मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
दोन दिवशीय शिबिरात ३५० जणांची नोंदणी ; शिल्पा खोत यांनी दिली माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका सौ. दर्शना कासवकर, भाई कासवकर यांच्या वतीने ४ आणि ५ ऑगस्ट रोजी यतीन खोत यांच्या धुरीवाडा येथील अरुणोदय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन दिवशीय शिबिरात ३५० जणांनी नोंदणी केल्याची माहिती सौ. शिल्पा खोत यांनी दिली.
शहरातील वॉर्ड क्र. १ आणि ६ (धुरीवाडा, चिवला बीच, टोपीवाला हायस्कुल, कन्याशाळा परिसर) आणि वॉर्ड क्र. ५ ( भरड, रेवतळे आणि बांगीवाडा) याठिकाणच्या लाभार्थ्यांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतिन खोत, भाई कासवकर, कुडाळ मालवण युवती प्रमुख समन्वय सौ. शिल्पा खोत, नंदा सारंग, प्रमिला मयेकर, स्विटी मोहिते, शुभम माने, प्रल्हाद चिंदरकर, लीलाधर सावबा आदी जण उपस्थित होते.
या शिबिरासाठी डॉ. प्रवीण गोरुले, मिलिंद आरोसकर, प्रवीण तेली, रसिका मोरे, समिधा परब सुचिता सावडावकर, रश्मी नाईक यांचे सहकार्य लाभले. या शिबिराला अंकिता सावंत सावंतवाडी या आरोग्य मित्राचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले, अशी माहिती सौ. खोत यांनी दिली.