निलेश राणेंची मध्यस्थी ; “त्या” युवकाची साडेचार लाखांची शस्त्रक्रिया झाली मोफत…

मुंबईतील जसलोक रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या कर्तृत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावातील रहिवाशी गणेश धुरी यांच्या उजव्या हाताची सुमारे साडेचार लाखांची शस्त्रक्रिया निलेश राणे यांच्या मध्यस्थीने मुंबईतील नामवंत जसलोक रुग्णालयात मोफत करण्यात आली आहे.

आंदुर्ले गावातील रहिवाशी गणेश धुरी यांच्या उजव्या हाताला दीड वर्षांपूर्वी झालेल्या एका अपघातात गंभीर दुखापत झाली होती. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नव्हते. ही बाब भाजपा नेते निलेश राणे यांचे कार्यकर्ते शेखर राणे यांना समजताच भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, राणे समर्थक सुशील यादव, शेखर राणे यांच्या पाठपुराव्यातून मुंबईतील जसलोक रुग्णालयात गणेश धुरी यांच्या हातावर सुमारे साडेचार लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यासाठी भाजपा नेते निलेश राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!