आयुष्मान भारत कार्ड : सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाची “डबल सेंच्युरी”

मोफत आयुष्यमान कार्ड साठी घेतलेल्या तीन शिबिरांमध्ये २१० हून अधिक जणांनी घेतला लाभ

शुक्रवारी घेतलेल्या शिबिरालाही नागरिकांचा प्रतिसाद ; उद्या (शनिवारी) देऊळवाडा येथील हॉटेल महाराजामध्ये शिबिराचे आयोजन

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या पुढाकाराने मोदी@9 अभियाना अंतर्गत मालवण शहरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत ‘आयुष्मान कार्ड’ विशेष शिबिराना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ताम्हणकर फिशिंग सेंटर मध्ये घेतलेल्या शिबिरालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत महिन्याभरात तीन वेळा घेतलेल्या शिबिराचा जवळपास २१० हून अधिक जणांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणाचा विचार करून उद्या (शनिवारी) देऊळवाडा येथील हॉटेल महाराजामध्ये हे शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.

आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत १२०९ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. ५ लक्ष वैद्यकीय संरक्षण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांकरिता प्रति कुटुंब, प्रति वर्ष रु. १.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी – रु. २.५ लक्ष पर्यंतचे विमा संरक्षण) प्रति कुटुंब, प्रति वर्ष देण्यात येते. हे आयुष्मान कार्ड बनविण्यासाठी नागरिकांना सुलभ व्हावे यासाठी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या पुढाकारातून मालवण मध्ये विशेष शिबीर घेण्यात येत आहेत.

ही योजना २०१८ मध्ये आल्यानंतर आजपर्यंत पाच वर्षात मालवण शहरात केवळ १८० जणांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाच्या वतीने महिन्याभरात तिनवेळा आयोजित केलेल्या या शिबिरांमध्ये २१० हून अधिक जणांनी नोंदणी करून घेतली आहे. शुक्रवारी देखील हे शिबीर ताम्हणकर फिशिंग सेंटर मध्ये घेण्यात आले. यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जिल्ह्यासह मालवणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांना हे कार्ड काढण्यासाठी बाजारपेठेत येताना अडचणी निर्माण होत आहे. ही अडचण विचारात घेऊन शहरातील विविध वॉर्डात जाऊन हे शिबीर आगामी काळात घेतले जाणार आहे. उद्या (शनिवारी) देऊळवाडा पेट्रोलपंपा नजिक हॉटेल महाराजा येथे हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वा. पासून या शिबिराला सुरुवात होणार असून शिबिरात सहभागी होण्यासाठी सकाळी १० वा. नंतर सौरभ ताम्हणकर ७५८८५६४८८७, जगदीश गावकर ९४२३३०२४४७, मनोज डिचवलकर ९७३०१९४९७३ किंवा अनिकेत घाडीगावकर ९०४९०६९९९१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!