कुडाळ – मालवण मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून निघणार ; २.३० कोटींचा निधी
भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंकडून खासदार निधी उपलब्ध
राज्य शासनाच्या अन्य विविध हेड खाली निधी मिळवण्यासाठी निलेश राणेंचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु
जनसंपर्क दौऱ्यादरम्यान स्थानिकांनी सुचविलेल्या विकासकामांचा समावेश ; दादा साईल यांची माहिती
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रभारी तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ आणि मालवण तालुक्यात तब्बल २ कोटी ३० लक्ष एवढा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. गेले महिनाभर निलेश राणे यांच्या माध्यमातुन कुडाळ, मालवण मतदारसंघात जनसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानादरम्यान निलेश राणे यांनी कुडाळ व मालवण तालुक्यातील ६२ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देत पक्ष संघटना व स्थानिक पातळीवरील समस्या यांचा आढावा घेतला होता. यावेळी स्थानिकांकडून सुचविलेल्या विकासकामांकरिता निधी मिळावा अशी मागणी निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याजवळ केली होती. त्यानुसार नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून २ कोटी ३० लक्ष एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे.
याशिवाय निलेश राणे यांनी प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रविंद चव्हाण, ग्रामविकास मंत्री गिरीश बापट आणि अन्य मंत्री महोदय यांची भेट घेत कुडाळ-मालवण मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पंतप्रधान/मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, २५/१५, प्रादेशिक पर्यटन, अर्थ संकल्पीय तरदूद(बजेट), डोंगरी विकास निधी, पुरहानी, दलित वस्ती सुधार योजना, शाळा/अंगणवाडी दुरुस्ती, साकव दुरुस्ती, जलसंधारण, पाटबंधारे आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरगोस निधीची तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यामुळे कुडाळ, मालवण मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग आगामी काळात भरून निघणार आहे
या निधीबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर आणि अन्य सर्व पदाधिकारी यांनी विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
मालवण तालुका
1) आचरा गाउडवाडी सभा मंडप बांधणे.
- 5 लक्ष
2) पळसंब शाळा नं १ ते माने घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
-5 लक्ष
3) चिंदर सातेरी मंदिर ते बागवाडी जाणार रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
4) काळसे परब वाडा घाडीवाडा येथील नाल्यावर पाईप बसवणे.
- 5 लक्ष
5)अजगणी तारभाट रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
6) कोळंब बेळणे मुख्य रस्ता ते करलकर घर रस्ता उंची वाढविणे.
- 4 लक्ष
7) माळगाव लाटकोंड साकवा नजिक सवरक्षक भिंत बांधणे.
- 6 लक्ष
8) बिलवस वरचा वाडा गोडीचींच ते गांगोचिराई पर्यंत जाणार रस्ता डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
9) जुनी स्टेट बँक कॉर्नर ते बंदर जेटी पर्यंत गटार व्यवस्थापन करणे.
- 5 लक्ष
10) पांडलोस मुख्य रस्ता ते मांडविर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
11) मसुरे डागंमोडे शाळेनजीक गणेशघाट बांधणे.
- 5 लक्ष
12) गोळवन डिकवल हद्द ते वायंगवडे मेस्त्रीवाडी घोगळेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
13) निरोम भरडवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
14) हेदुळ मोर्येवाडी ते गावडेस्थळवाडी मार्गे गवळदेव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
15) मिऱ्याबांदा सर्जेकोट मारुतीमंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लाख
16) कुंभारमाट साळगावकरवाडी सावंतवाडी रस्त्याशेजारी संरक्षणभिंत बांधणे.
- 5 लक्ष
17) कुंभारमाट शिवाजी महाराज पुतळा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
- 5 लक्ष
खासदार निधीसाठी विकासकाम यादी कुडाळ तालुका.
◆ कुडाळ मंडल ◆
1) गोठोस एकुंद्रेवाडी रस्त्यावर मोरी बांधणे, ता. कुडाळ
- 3 लक्ष
2) गोठोस ग्रामपंचयात हद्दीत स्ट्रिटलाइट बसविणे, ता. कुडाळ
- 2 लक्ष
3) पाट देसाईवाडा ते सातेरी मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 3 लक्ष
4) आंदुर्ले आवेरीवाडी येथे विहीर बांधणे, ता. कुडाळ
- 7 लक्ष
5) आकेरी भगतवाडी भागाबाई वरक यांच्या घराजवळ जाणाऱ्या रस्त्यावर मोरी बांधणे.
- 5 लक्ष
6) तेर्सेबांबर्डे ग्रामपंचयात हद्दीत सभामंडप बांधणे ता. कुडाळ
- 5 लक्ष
7) साळगाव पायरोबा मंदिर मुख्य रस्ता ते सावंत कुलदेवता मंदिर येथे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ता. कुडाळ
- 5 लक्ष
8) पुळास बिब्याची वाडी रस्ता मजबूतीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
9) वालावल चौधरीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
10) केरवडे तर्फ माणगाव देवूळवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
11) सरंबळ सातेरी मंदिर ते ग्रामपंचायत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
◆ ओरोस मंडल ◆
12) सोनवडे नळेकरवाडी महापुरुष मंदिरास संरक्षण भिंत बांधणे.
-3 लक्ष
14) गडकरीवाडी (शिवाजी पुतळ्याजवळ) गणेशघाट बांधणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष
15) नारुर महालक्ष्मी मंदिर रस्त्यालगत सोलार हायमास्ट बसविणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष
16) आंबाडपाल भद्रकाली मंदिर मुख्यरस्ता ते गुरुनाथ चव्हाण यांच्या घराकडेजाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
17) पणदूर सिध्दवाडी येथे हायमास्ट बसविणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष
18) पावशी घावनळे मुख्य रस्ता ते तेली कुळाचार मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
19) पावशी गोसावी चव्हाणवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 7 लक्ष
20) पडवे सुरेश परब यांच्या घरामागून जाणाऱ्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे, ता. कुडाळ
- 3 लक्ष
21) रांगणातूळसुली वाघबिळ रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
22) गिरगाव लिंगमंदिर येथे हायमास्ट उभारणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष
23) कुसगाव पावनाई मंदिर येथे हायमास्ट उभारणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष
24) वर्दे केसरकर राई ते फातरीचे गाळू मार्गे म्हातारा देव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 5 लक्ष
25) भरणी आगरवाडी महापुरुष मंदिराजवळ जाणार्या रस्त्यास संरक्षण भिंत बांधणे, ता. कुडाळ
4 लक्ष
27) ओरोस खुर्द मुख्यरस्ता ते ख्रिश्चनवाडी पर्यन्त जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, ता. कुडाळ
- 4 लक्ष