जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जागतिक हिपॅटायटीस प्रतिबंधक दिन साजरा
ओरोस फाटा ते जिल्हा रुग्णालयापर्यंत जनजागृती रॅली
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने शुक्रवारी जागतिक हिपॅटायटीस प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यावेळी परिचर्या प्रशिक्षण विदयालयाच्या विदयार्थीनींची ओरोस फाटा ते जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग अशी जनजागृतीबद्दल रॅली काढण्यात आली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शाम पाटील, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, आर.बी.एस. के जिल्हा समन्वयक राजेश पारधी, परिचर्या प्रशिक्षण विदयालयाच्या प्राचार्या शिल्पा म्हाकले, एनआरएचएमचे जिल्हा प्रकल्प अधिकारी दयानंद कांबळे, निलेश गावडे, एआरटी सेंटरचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. ढोकशे, रुग्णालयीन कर्मचारी राजाराम फाळके, समीर तडवी, विश्वनाथ राव, श्रीम रुचिरा साटविलकर, विवेक आंगणे, आरबीएसके कर्मचारी, कोकण कला व शिक्षण विकास संस्था, जागृती फाऊंडेशन, नर्सिंग कॉलेज पाठवनिर्देशक श्रीम हर्षदा सामंत, श्री भागवत गिरी, श्रीम प्रणाली शिरोडकर, श्रीम रक्षंदा जाधव आदी उपस्थित होते.
काविळ हा आजार काय असतो हे आजही सर्वसामान्य लोकांना माहित नाही. अजूनही लोकांध्ये कावीळ या आजारासंदर्भात कोणतीही जनजागृती नाही आणि गांभिर्याने पाहीले जात नाही. काविळमध्ये ए, बी, सी हे प्रमुख प्रकार आहेत. यामध्ये बी हा प्रकार घातक ठरु शकतो. कावीळ लागण झाल्यास चाचणी करून उपचार करणे आवश्यक असते. आज जागतिक हिपॅटायटीस प्रतिबंधक दिन या निमित्ताने हिपेटायटिस बी विषयी जनजागृती करण्याच्या निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.