पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्र शुभारंभाचे मालवणात थेट प्रसारण
खरेदी विक्री संघात कार्यक्रम ; तालुक्यात इतर १६ ठिकाणी कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण ; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधुन “पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा” शुभारंभ केला. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या प्रसारणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेती आवश्यक सर्व औषधे, खते, बी – बियाणे, औजारे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथून “पंतप्रधान किसान समृद्धी सुविधा केंद्राचा” शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघात आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष बबलू राऊत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, संचालक आबा हडकर, के पी चव्हाण, अशोक तोडणकर, आप्पा लुडबे, संतोष गावकर, ललित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी व्ही. जी. गोसावी, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण, यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी आजच्या कार्यक्रमात किसान समृद्धी सुवीधा केंद्र देशभरात २ लाख ८ हजार ठिकाणी सुरु केली. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, औषधे, खते, कीटकनाशके व अन्य अवजारे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदघाटनपर भाषण मालवण तालुका खरेदी विक्री संघात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आले. यासह मालवण तालुक्यात इतर सोळा ठिकाणी या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शेतक-यांना शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते यांच्या खरेदीसाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. पंतप्रधान किसान सुविधा केंद्र ही योजना शेतक-यांना या सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणाहून पुरविण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. एकाच ठिकाणी बी-बियाणे, औषधे, औजारे, खते उपलब्ध झाल्यामुळे त्यांची धावपळ वाचणार आहे.