खरारे पेंडूर ग्रा. पं. च्या सरपंच निवडणुकीत भाजपचा दणादणीत विजय ; ठाकरे गटाचा नामुष्कीजनक पराभव
सरपंचपदी भाजपाच्या सौ. नेहा नंदकुमार परब यांची ९ विरुद्ध २ मतांनी निवड
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील ग्रामपंचायत खरारे पेंडूरच्या सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचा दणादणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. नेहा नंदकुमार परब यांची ९ विरुद्ध २ अशा मतांनी निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत व जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांनी नवनिर्वाचित सरपंच सौ. परब यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी मावळत्या सरपंच सुनीता मोरजकर, आतीक शेख, दीपा सावंत, शेखर फोंडेकर, साबाजी सावंत, संजय नाईक, सतीश पाटील, श्रावणी नाईक, श्वेता फोंडेकर, उत्तम परब, अमित सावंत उपसरपंच विवेक जबडे, सुमित सावंत, कृष्णा माडकुलकर, शैलेश परब, अश्विनी पेडणेकर, समृध्दी सरमळकर, अंकिता सावंत, रवी गावडे, संदीप सरमळकर, संदेश नाईक, शाम आवळेगावकर, सुरेंद्र जबडे,आबा वारंग व अन्य उपस्थित होते. मावळत्या सरपंच सुनीता मोरजकर मोरजकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपाकडून नेहा परब व शिवसेना ठाकरे गट कडून वैष्णवी लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत भाजपच्या नेहा परब यांना नऊ मते मिळाली तर शिवसेना ठाकरे गटाच्या वैष्णवी लाड यांना दोन मते मिळाली. सौ. परब या विजयी होत सरपंच पदी विराजमान झाल्या.