वायरी मुस्लिम मोहल्ला येथील आपदग्रस्ताला निलेश राणेंकडून आर्थिक मदत
भाजपा पदाधिकाऱ्यांनी मदत केली सुपूर्द
मालवण | कुणाल मांजरेकर
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत शहरातील वायरी मुस्लिम मोहल्ला येथील बाऊद्दिन शेख यांच्या घराची भिंत पडून नुकसान झाले होते. याठिकाणी भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांच्याकडून नुकसानग्रस्त शेख यांना देण्यात आलेली आर्थिक मदत भाजपा पदाधिकाऱ्यांनी संबंधितांकडे सुपूर्द केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, स्थानिक माजी नगरसेवक आप्पा लुडबे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, कमलेश कोचरेकर, ईन्तू शेख, हसरत खान, रसुल खान, बाबा शेख, नझीर शेख आदी उपस्थित होते.