मालवण शहरात युवती सेनेकडून नियुक्त्यांचा सपाटा ; प्रभाग ३ च्या बूथप्रमुख पदी मानसी घाडीगावकर यांची निवड जाहीर

युवती सेना कुडाळ – मालवण समन्वयक शिल्पा खोत यांची माहिती ; कुडाळ येथील बैठकीत निवड

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहराच्या प्रभाग क्र. ३ मध्ये युवती सेनेच्या बूथप्रमुख पदी मानसी महेश घाडीगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना, युवती सेनेची बैठक कुडाळच्या रेस्ट हाऊसवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही निवड जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कुडाळ मालवणच्या युवती सेना समन्वयक सौ. शिल्पा यतीन खोत यांनी दिली आहे.

कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर युवासेना, युवती सेनेची बैठक मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य तथा युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रवीण पाटकर व महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्या तथा युवासेना कार्यकारिणी सदस्या सुप्रदा ताई फातर्पेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी युवती सेना विस्तारक रुची राऊत यांच्यासह युवतीसेनेच्या तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, युवतीसेना कुडाळ तालुकाप्रमुख सौ. अश्विनी, उपतालुकाप्रमुख सौ. रूपा कुडाळकर, आर्या गावकर, सुरवी लोणे, माधुरी प्रभू, काजल सावंत भोसले, दिया पवार, सौ. दीपा पवार, सौ. तोडणकर, तन्वी भगत, शांती तोंडवळकर, पूजा औंधे आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3593

Leave a Reply

error: Content is protected !!