वायरी भूतनाथ मधील नुकसानग्रस्तांनाही निलेश राणेंकडून मदतीचा हात…

भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रोख स्वरुपातील मदत संबंधिताना सुपूर्द ; शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

मालवण : मालवण तालुक्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीमुळे नुकसान झाले. वायरी येथील सुरेखा मयेकर, कृष्णा गोसावी, गणेश परब यांच्या घराचे नुकसान झाले होते. भाजपा नेते निलेश राणे यांच्यावतीने देण्यात आलेली आर्थिक मदत भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांना सुपूर्द केली. शासन स्तरावरूनही लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, वायरी माजी सरपंच भाई ढोके, मंदार लुडबे, भाई मांजरेकर, राहुल नरे, प्रतिक लुडबे, ओंकार लुडबे, शैलेश लुडबे, सागर मायबा, यश देसाई, सुयश मायनाक, कुणाल नाईक, प्रतिक वाघ, नारायण लुडबे, गौरव तळगावकर, गजा रावले आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!