पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची मांगेली धबधब्याला भेट ; सुरक्षेचा घेतला आढावा…

दोडामार्ग | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी शनिवारी दोडामार्ग तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मांगेली येथील धबधब्याला भेट दिली. यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेचा आढावा त्यांनी घेतला. पर्यटकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन मौजमजा लुटावी, असे आवाहन करतानाच याठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना केल्या.

जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस व पर्यटन स्थळी होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी शनिवारी दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा व तिलारी धरण येथील पर्यटनस्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी सावंतवाडी विभागीय पोलिस उपअधिक्षक संध्या गावडे तसेच इतर पोलिस अधिकारी, दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. मांगेली धबधबा या ठिकाणी पाहणी करून आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सौरभ अग्रवाल यांनी सांगितले की, येथील पर्यटन स्थळांची पाहणी केली. या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा काय आहेत, याची माहिती घेण्यासाठी तसेच येथील पर्यटनस्थळी पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहीजे या बाबत आवश्यक त्या सुचना देण्यासंदर्भात हा दौरा होता, असे ते म्हणाले.

मालवण, कुडाळ मधील पत्रकारांसमवेत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!