तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी १५,१६ जुलैला कुडाळात मोफत मार्गदर्शन शिबीर ; आ. वैभव नाईकांचा पुढाकार

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन

मालवण : तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने तसेच विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मार्गदर्शन शिबीर घेण्यात येत आहे. कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे शनिवार १५ जुलै व रविवार १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे.

अरुण नरके फौडेशन कोल्हापूर ही संस्था स्पर्धा परीक्षा व सामाजिक क्षेत्रातील तब्बल २६ वर्षाचा अनुभव असणारी विश्वनीय संस्था आहे. आजपर्यंत त्यांचे ४६५० विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत कार्यरत आहेत. या संस्थेचे मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना व्हावे आणि सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी तलाठी व्हावेत यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी तलाठी भरतीच्या मोफत मार्गदर्शन शिबीराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घावा, त्यासाठी आपली नावनोंदणी करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी १४ जुलैपर्यंत समीर कुंभार मोबा- ९१४२४३४४४८ तेजस मडवळ मोबा- ८७६७०९५०११ यांच्याकडे करावी, असे आवाहन विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवलीच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!