मालवण शहरातील मेढा, कोतेवाडा येथे वीज संबंधित कामांसाठी ३ लाख रु. मंजूर

सिंधुरत्न योजनेत आ. वैभव नाईक यांची शिफारस ; महेश जावकर यांची माहिती

मालवण : आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार सिंधुरत्न योजनेमधून मालवण शहरातील मेढा कोथेवाडा येथील विद्युत पोल शिफ्ट करणे, थ्रीफेज लाईन ओढणे व स्ट्रीट लाईट बसविणे या कामासाठी ३ लाख रु. मंजूर करण्यात आले आहे.

लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असून येथील वीज समस्या मार्गी लागणार आहे. माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी या कामाची मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून या कामाला निधी मंजुर केल्याबद्दल स्थानिक नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!