रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

मालवण : रोटरी क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रोटरी क्लब मालवणतर्फे आयोजित आणि स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे आयोजित या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.

जागतिक पातळीवर कार्यरत असणारा रोटरी क्लब यावर्षी २५ व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त १ जुलै २०२३ ते ३० जून २०२४ असे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे होणार आहे. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या अंतर्गत रोटरी क्लब मालवणतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब मालवणचे नूतन अध्यक्ष अभय कदम, नूतन सचिव संदेश पवार, माजी अध्यक्ष रतन पांगे, महादेव पाटकर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, रमाकांत वाक्कर, रंजन तांबे, अवी नेरकर, यश तारी, सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, सचिव अमेय देसाई, प्रदीप नाईकसाटम, ग्लोबल रक्तदाते समूहाचे नेहा कोळंबकर, राधा केरकर, संदीप पेडणेकर, समृद्धी धुरी, विकास पांचाळ तसेच निलेश गवंडी, हेमंत शिरगांवकर, ललित चव्हाण, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी आदी व इतर उपस्थित होते. या शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्याना रोटरी क्लब कडून सन्मानचिन्ह व जिल्हा रक्तपेढी कडून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!