भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून धुरीवाडा, रेवतळे, देऊळवाडाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक

शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियाना अंतर्गत पंकज पेडणेकर यांच्या निवासस्थानी घेतली भेट

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मजबूत संघटन बांधणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मोदी @9 अभियाना अंतर्गत भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी माजी खासदार निलेश राणे यांनी नुकतीच रेवतळे येथे शक्तीकेंद्र प्रमुख पंकज पेडणेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली धुरीवाडा, रेवतळे, देऊळवाडा येथील सर्व बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांचे निलेश राणे यांनी कौतुक केले.

माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली धुरीवाडा, रेवतळे, देऊळवाडा परिसरात संघटनात्मक बांधणी करण्यात आली आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या शक्तीकेंद्र प्रमुख संपर्क अभियानाअंतर्गत त्यांनी पंकज पेडणेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, आप्पा लुडबे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटकर, शक्तीकेंद्र प्रमुख पंकज यांच्या, कॅलीस फर्नांडिस, विजय केळूसकर, निलेश पांजरी, सुनील बागवे तसेच माजी नगरसेविका रेश्मा मांजरेकर, महानंदा खानोलकर, अर्चना मिठबावकर, विलास मुणगेकर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेश सारंग, राजू बिडये, बबलू राऊत, रोहन सावंत, राजा मांजरेकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!