मालवणात भाजपला खिंडार…

शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही ; आ. वैभव नाईक यांचा टोला

आडवली – मालडी मतदार संघात श्रावण मध्ये भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण तालुक्यातील आडवली- मालडी मतदार संघात शिवसेनेने भाजपला खिंडार पाडले आहे. भाजपच्या श्रावण गावातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी रविवारी कणकवली विजय भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. शिवसेना वाढतच राहणार आहे. अलिकडेच भाजपचे असगणी सरपंच हेमंत पारकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मालवण तालुक्यातील श्रावणमधील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांचे पक्षात स्वागत आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी केले.

यावेळी योगेश परब, महेश मधुकर परब, संजय परब, दिपेश परब, मनोज पाडावे, विवेक धुरी, भुषण परब, भालचंद्र परब, सचिन परब, कृष्णा परब, विशाल परब, महेश परब, संतोष परब, सुमीत परब, प्रथमेश परब, दिक्षात परब, उमेश परब, संकेत परब, संतोष परब, मंदार परब, शंकर परब आदींसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. संपूर्ण आडवली- मालडी विभाग भगवामय केल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला असे अनेक धक्के येत्या काळात देण्यात येणार आहेत असे विभाग प्रमुख बंडू चव्हाण यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाबा सावंत, विभाग प्रमुख बंडू चव्हाण, माजी विभाग प्रमुख दीपक राऊत, विभाग संघटक संतोष घाडी, उपविभागप्रमुख प्रवीण परब, दुलाजी परब, नाना गुरूजी विजय पालव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!