मतभेद बाजूला ठेवा ; आगामी निवडणुकीत भाजपाच्या १००/% विजयासाठी कामाला लागा ; राजन तेली यांचं आवाहन

तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा वाढदिवस मालवणात उत्साहात साजरा ; तेलींनी केला चिंदरकर यांच्या कार्याचा गौरव

मतभेद असतील तर आजपासून संपवूया, सर्वांनी हातात हात घालून काम करूया : धोंडू चिंदरकर यांचं आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपाचे मालवण तालूकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा ५१ वा वाढदिवस भाजपाच्या मालवण कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गर्दीत उत्साहात साजरा करण्यात आला. धोंडू चिंदरकर हे भारतीय जनता पक्षाचे निःस्वार्थी कार्यकर्ते असून त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात संघटनेची घोड दौड सुरु असल्याचं राजन तेली यांनी यावेळी सांगितलं. आज जिल्ह्यात भाजपाकडे मजबूत संघटना आहे. आपल्यातील अंतर्गत मतभेदामुळेच काही निवडणुकीत आपल्याला पराभव स्वीकारावा लागला. २०१४ मध्ये राणे साहेबांचा पराभव झाला. मात्र २०१४ च्या पराभवाचा वचपा आपल्याला २०२४ मध्ये काढायचा आहे. त्या दुष्टीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने आपल्यातील मतभेद बाजूला ठेऊन पक्ष संघटना म्हणून कामाला लागावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी यावेळी बोलताना केले.

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा वाढदिवस भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, विलास हडकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, सुदेश आचरेकर, आबा हडकर, राजन गावकर, ललित चव्हाण, मंदार लुडबे, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निशय पालेकर, भाऊ सामंत, संतोष कोदे, संतोष गावकर, दीपक सुर्वे, शेखर कांबळी, आपा लुडबे, अजिंक्य पाताडे, मोहन वराडकर, जगदीश गावकर, सुधीर साळसकर, अशोक चव्हाण, राजेंद्र प्रभुदेसाई, प्रमोद करलकर, बबलू राऊत, महेंद्र चव्हाण, विजय कदम, मनमोहन डिचोलकर, रामा चोपडेकर, चंदन कांबळी, विजय निकम, रोहन सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राजन तेली म्हणाले, आपण एकत्र असलो तर आपला पराभव करण्याची हिंमत कोणाची नाही. येणाऱ्या काळात नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वांनी एकत्र यावे. मालवण नगरपालिकेच्या १७ ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करा. जेव्हा नगरपलिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता असेल तेव्हा आपण हक्काने जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे राजन तेली म्हणाले.

… तर भाजपचा उमेदवार १०० % विजयी होईल : धोंडू चिंदरकर

आपला वाढदिवस साजरा केल्याबद्दल सहकारी आणि कार्यकर्त्यांचे धोंडू चिंदरकर यांनी आभार मानले. आज राणे साहेबांसारखे कणखर नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. आपल्याला विजय मिळवायचा असेल तर एकसंघ होऊन काम करावं लागेल. आपल्याकडे दत्ता सामंत, अशोक सावंत, बाबा परब, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांच्या सारखे मजबूत नेते आहेत। आपण सर्वांनी एकसंघ आणि एक विचाराने काम केले तर भाजपचा उमेदवार १०० % निवडून येऊ शकेल. आपल्यात मतभेद असू शकतात. कोणाच्या मनात कटुता असेल तर आजपासून ती संपवूया. मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही. मात्र आपण सर्वजण हातात हात घालून काम करतोय हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत जायला पाहिजे, असे धोंडू चिंदरकर म्हणाले.

यावेळी दत्ता सामंत म्हणाले, राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. त्यामुळे २०२४ मध्ये जिल्ह्यातील तिन्ही आमदार आणि खासदार भाजपचा निवडून आला पाहिजे, असे ते म्हणाले. तर अशोक सावंत यांनी धोंडू चिंदरकर यांच्या कार्याचा गौरव केला. तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांना सामावून घेण्याचे चिंदरकर यांनी केले. येत्या सर्व निवडणुकीत भाजपाचे वरिष्ठ नेते जे उमेदवार देतील, ते निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे श्री. सावंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!