आमदार नितेश नारायणराव राणे वाढदिवस विशेष

कुणाल मांजरेकर | मालवण

नितेश नारायण राणे … २३ जुन १९८२ साली जन्मलेल्या या ४१ वर्षाच्या तरुणाने आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवला आहे. कोकणचे भाग्यविधाते म्हणून ओळख असलेल्या माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कनिष्ठ सुपुत्र असलेल्या नितेश राणे यांनी आज राजकारण आणि समाजकारणात जे यश मिळवलं आहे, ते केवळ राणेसाहेबांचा सुपुत्र म्हणून नव्हे तर स्वतःच्या हिंमतीच्या आणि कर्तृत्वाच्या जीवावर त्यांची राजकीय वाटचालीची घोडदौड सुरु आहे. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे भाजपचे आमदार असलेले नितेश राणे हे हिंदू धर्माभिमानी नेते म्हणून ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशावर “लव्ह जिहाद” चे मोठे संकट उभे आहे. अनेक हिंदू मुली या षडयंत्राला बळी पडल्या आहेत. या विरोधात लढणारा एकमेव बुलंद आवाज म्हणजे नितेश राणे… हिंदू धर्माच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जवळपास १५ ते २० ठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे आयोजित करून हिंदू समाजाला जागृत करण्याचे काम नितेश राणे यांनी करत हिंदू समाजाची ताकद सर्वांना दाखवून दिली. यांच्यामुळेच लव्ह जिहादला फसलेल्या १० ते १२ मुली आज सुखरूप स्वतःच्या घरी परतल्या आहेत. यामुळेच नितेश राणे यांची “हिंदू धर्मरक्षक” ही नवीन ओळख बनली आहे. या युवा नेत्याचा आज २३ जुन २०२३ रोजी ४१ वा वाढदिवस… या निमित्ताने थोडक्यात घेतलेला आढावा….

आमदार नितेश नारायण राणे या नावाला स्वतंत्र ओळखीची गरज नाही. नितेश राणे हे नावच राजकारणातील ब्रँड बनला आहे. आणि हा ब्रँड त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर निर्माण केला आहे. मुंबईच्या राजकीय पटलावर कार्यरत असलेले नारायण राणे नावाचे वादळ १९९० च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गात दाखल झाले. मालवण – कणकवली मतदार संघात दाखल झाले. आणि बघता बघता या वादळाने संपूर्ण महाराष्ट्र पदाक्रांत केले. आमदार, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पुन्हा कॅबिनेट मंत्री, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार ते केंद्रीय मंत्री असा प्रवास केलेल्या नारायण राणे यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय राजकारणात वेगळी ओळख मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्याचे काम नारायण राणे यांनी केले. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांची दोन्ही मुले आज राजकारण आणि समाजकारणात कार्यरत आहेत. राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांनी २००९ ते २०१४ या कालखंडात रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार पद भूषवले आहे. तर कनिष्ठ सुपुत्र नितेश राणे हे २०१४ पासून आजगायत कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाची आमदारकी भूषवीत आहेत. विधिमंडळात एक कार्यतत्पर आमदार म्हणून त्यांची ओळख तर आहेच पण हिंदूधर्माभिमानी नेते म्हणून देखील आज राज्यभरात नितेश राणे ओळखले जातात.

नितेश राणे यांचा जन्म २३ जानेवारी १९८२ रोजी झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले. नितेश राणेंनी स्वाभिमान संघटनेची स्थापना करून कारकिर्दीची सुरुवात केली. आरोग्य समस्या, बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मुलभूत प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या व अन्य समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुंबई व महाराष्ट्रात पसरले. स्वाभिमानच्या माध्यमातून नितेश राणे यांनी २००९-१० पासून पाणी चोरी व पाणीटंचाई विरोधात मुंबईत तीव्र आंदोलन सुरु केले. टँकर माफिया विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिकांकरिता टोल फ्री सहायता क्रमांक सुरू केला. पालिका प्रशासन, स्थानिक नेते व पाणी माफिया यांच्यात असलेल्या संगनमतानेच पाण्याचा व्यापार सुरु असल्याची टीका त्यांनी केली. २०११ मध्ये ठाणे महानगरपालिका हद्दीत रोज १० लाख लिटर अवैधपणे पाणी उपसा करण्यात येत असलेली पाईपलाईन नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान संघटनेच्या सदस्यांकडून उध्वस्त करण्यात आली. नितेश राणे यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून आजवर अनेक रोजगार मेळावे आयोजित केले. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान केले. ऑक्टोबर २०११ मध्ये कामगार मैदान, मुंबई येथे स्वाभिमान संघटने तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या सर्वात मोठ्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवसात २५ हजार हून अधिक रोजगार देण्यात आले. हा रोजगार मेळावा जागतिक विक्रम म्हणून ओळखला गेला. या रोजगार मेळाव्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली.

सप्टेंबर २०११ मध्ये मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी व मनोरंजन क्षेत्राचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कलानिधी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून दिग्दर्शक संजय जाधव यांच्या दुनियादारी या चित्रपटासाठी सहाय्य करण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी चित्रपट व मालिका दिग्दर्शकांना उत्तम लोकेशन्स मिळावेत आणि अद्ययावत तंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी या हेतूने नितेश राणे कार्यरत राहिले.

फेब्रुवारी २०१२ मध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी, स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व येथे येणा-या पर्यटकांना योग्य माहिती मिळावी याकरता नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग टूर गाइड हा उपक्रम सुरु करण्यात आला.

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून त्यांनी निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने ते विजयी झाले. त्यानंतर पुन्हा एकदा २०१९ च्या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारत नितेश राणे दुसऱ्यांदा आमदार झाले. त्यावेळी आपल्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली मात्र त्यांच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या विजयानंतर नितेश राणे यांनी मागे वळून पहिलेच नाही. मतदार संघाचा आदर्श असा सर्वांगीण विकास हेच लक्ष ठेवून काम सुरू ठेवले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व पर्यटनाच्या माध्यमातून विकास हे धोरण ठरवून या माध्यमातून अनेक दालने त्यांनी उभारली.

एकीकडे स्वतःच्या मतदार संघात विकास कामांचा झंझावात निर्माण करणाऱ्या नितेश राणे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात युवा नेता म्हणून स्वतःचे वलंय निर्माण केले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरे करून मराठा नेता म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.

राज्यात मागील अडीज वर्षात असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर, लव्ह जिहाद, लँड जिहादच्या घटना घडत होत्या. हिंदूंवरील अत्याचार वाढले होते. मालवणी भागात हिंदुना पलायन करण्यास प्रवृत्त केले गेले. हिंदू साधूंना ठेचून क्रूर पद्धतीने मारण्यात आले. हिंदूंवरील वाढते अत्याचार पाहून हिंदू समाज एकवटला. ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले. त्यातील अनेक मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले. हिंदूंमध्ये धगधगता अंगार फुलविला. हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लव्ह जिहाद ला बळी पडलेल्या १२ हिंदू मुलींची आतापर्यंत नितेश राणेंनी सुटका केलेली आहे. राजकीय वजाबाकीची तमा न बाळगता धर्मासाठी लढणाऱ्या नितेश राणेंना हिंदू धर्मरक्षक ही उपाधी तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते जनतेने दिली. आतापर्यंत सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, मुंबई, अहिल्या नगर, नाशिक, शिर्डी, श्रीरामपूर, या भागांमध्ये निघालेल्या अतिविराटहिंदू मोर्चाचे नेतृत्व नितेश राणेंनी केले. नुकतेच त्र्यंबकेश्वर दौरा करून हिंदू मंदिरांवर अतिक्रमण करू पाहणाऱ्या धर्मांध लोकांना मनसुबा हाणून पाडला व मंदिरात महाआरती करून हिंदूंची ताकद दाखवून दिली.

४ जून रोजी पुण्यातील मुंढवा भागात आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात हिंदू मोर्चा काढण्यात आला. एका हिंदू भगिनीला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन फूस लावून पळवून नेले होते. त्या मुलीची त्या धर्मांधांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. त्या मुलीने स्वतः मोर्चात स्वतः सहभाग घेऊन आमदार नितेश राणे यांच्या पत्रकार परिषदेत स्वतःचे अनुभव कथन केले. कसे धर्मांतर साठी प्रवृत्त केले जाते, बुरखा घालण्याची तसेच कुराण पठण ची जबरदस्ती हिंदू मुलींवर करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा रोखठोक इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला व त्या बळी पडलेल्या मुलीची सुटका करण्यात आली. पुण्यातील दौंड शहरात बादशहा शेख या व्यक्तीने हिंदू महिला भगिनींवर अत्याचार करत हिंदू कुटुंबांवर हल्ले केले, त्यावेळी दौंड शहरात मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला जाब विचारला गेला, आमदार नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर अनेक दिवस फरार असलेल्या बादशहाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

नगरच्या कापड बाजारात धर्मांध लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानदार हिंदू व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास दिला, हिंदू व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले, त्याच कापड बाजारात जाऊन नितेश राणेंनी धर्मांध लोकांना इशारा देऊन तिथल्या व्यापाऱ्यांना खंबीर साथ दिली. शिवाय नगरमध्ये जिथे जिथे हिंदूंवर हल्ले अत्याचार झाले त्यांना भेटून धीर देत त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहिले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आज महाराष्ट्रात कुठेही हिंदू अत्याचाराची घटना घडली तिथे नितेश राणेंनी भेट द्यावी अशी मागणी होते. हिंदूंसाठी रोखठोक बोलणारा समोरच्यांना निर्भीडपणे जशास तसे उत्तर देणारा आणि न्याय मिळवून देणारा नेता अशी ओळख आज महाराष्ट्रभर झाली आहे. अनेक मुलींची जिहादींच्या तावडीतून सुटका करून हिंदू माता भगिनींच्या पाठीशी भाऊ बनून उभे राहिले आहेत. जिथे जिथे हिंदूंवर अन्याय झाला तिथे तिथे आमदार नितेश राणे मदतीसाठी धावून आले. म्हणूनच आज महाराष्ट्रभर हिंदुत्वाची ज्वलंत तोफ म्हणून त्यांची ओळख बनली आहे. अशा या कोकणच्या लाडक्या नेत्याला कोकण मिरर परिवाराकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !!!!

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!