“आभाळमाया” च्या वराड येथील रक्तदान शिबिरात ८१ जणांचे रक्तदान !

राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अन् गुणवंत मुलांचे सत्कार

मालवण | कुणाल मांजरेकर

सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कट्टा – वराड येथील “आभाळमाया” ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वराड ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ८१ जणांनी रक्तदान केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अन् गुणवंत मुलांचे सत्कार अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमानी हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

आभाळमाया ग्रुप विविध सामाजिक उपक्रमांसाठी अल्पावधीतच नावारूपाला आला आहे. आभाळमाया ग्रुपने गेल्या दोन वर्षात कट्टा पंचक्रोशीतील कॅम्पच्या माध्यमातुन तब्बल ७७६ पिशवी रक्तदान उपलब्ध करून दिले आहे. सोमवारी ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त वराड ग्रा. पं. सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ८१ जणांनी रक्तदान केले. तसेच वराड येथील सौ.हिराबाई वरस्कर विद्यामंदिर येथील सहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणीक वस्तू आणि वार्षिक शैक्षणिक खर्च देण्यात आला, तसेच दहावीत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तीन विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तर गुरामवाडी प्राथमिक शाळा क्रमांक २ येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी वराड गावच्या सरपंच सौ.शलाका समीर रावले, कट्टा गावचे सरपंच शेखर पेणकर, वराड गावचे उपसरपंच गोपाळ परब, आंबेरी गावचे सरपंच मनोज डीचोलकर, तिरवडे गावचे उपसरपंच सुशिल गावडे, ग्रामविकास अधिकारी संतोष गावडे, हॉटेल अतिथी बांबूचे मालक आणि जेष्ठ समाजसेवक संजय गावडे, आभाळमायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील नाईक, पत्रकार कुणाल मांजरेकर,कोरोना योद्धा राजेश पारधी, घर मिठबावकरचे मालक मिथिलेश मिठबावकर, वराड गावचे कोरोना योद्धा डॉ.प्रथमेश वालावलकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, एक्साईज ऑफिसर जगन चव्हाण, उद्योजक मनोज वायंगणकर, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, उद्योजक समीर रावले, समाजसेवक बबन पांचाळ, समाजसेवक छोटू ढोलम, वराड गावचे माजी सरपंच बबन मिठबावकर,स्मिता कंप्यूटर इंस्टिट्यूटच्या सर्वेसर्वा सौ.श्रद्धा नाईक, ऍड. प्रदीप मिठबावकर, प्रवीण मिठबावकर, जयेंद्रथ परब व इतर मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आभाळमाया ग्रुपचे सदस्य रामचंद्र आंबेरकर, जगदीश परब, शुभम मसुरेकर, गौरव हिर्लेकर, अभिषेक रावले, जय वेंगुर्लेकर, प्रणित चव्हाण, शुभम घोगळे, गणेश मोरजकर, भाई वेंगुर्लेकर, राहुल डगरे, समीर नारिंग्रेकर, अर्जुन परब, युवराज ढोलम, तेजस म्हाडगुत, लक्ष्मण पावसकर, साईनाथ सरमळकर यांनी मेहनत घेतली तसेच वराड ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!