“ई स्टोअर इंडिया” ला मनसे देणार धक्का …

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी मनसे नेते परशुराम उपरकर उदया मालवणात करणार चर्चा

गुंतवणूकदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे ; मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ई स्टोअर मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांशी मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर रविवारी १८ जुन रोजी दुपारी ३ वाजता मालवण मधील मनसेच्या राजगड मध्यवर्ती कार्यालयात चर्चा करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड यांनी दिली आहे.

हे सर्व गुंतवणूकदार रविवारी दुपारी ३ परशुराम उर्फ जीजी उपरकर यांची भेट घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील ई स्टोअर मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूक धारकांनी तक्रारपत्र व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. यावेळी पक्षाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी देखील कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!