अखेर देवबाग ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयाला ठोकले टाळे !
सहाय्यक अभियंता दाखल न झाल्याने ग्रामस्थ संतप्त
मालवण ! कुणाल मांजरेकर
विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी देवबाग ग्रामस्थांनी आगाऊ सूचना देऊनही वीज वितरण चे अधिकारी कार्यालयात उपस्थित न राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी अखेर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले आहे. अधिकारी येईपर्यंत टाळे खोलणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
वीज वितरणातील समस्या मांडण्यासाठी मंगळवारी सकाळी ग्रामस्थांसमवेत विजेच्या कार्यालयात येणार असल्याची माहिती सरपंच उल्हास तांडेल यांनी दिली होती. मात्र अधिकारी साखरे उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले.