भाजपा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुखपदी प्रमोद जठार
सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्या. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणूक प्रमुखपदी भाजपा नेते प्रमोद जठार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर यांनी दिली आहे.
माजी आमदार प्रमोद जठार यांनी मागच्या दोन वर्षात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्याच्या बळावर संघटन बळकट करण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत २०२४ च्या निवडणुकीत ते भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.