सागर वाडकर : दिलदार मनाचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व….

प्रतिथयश उद्योजक सागर वाडकर वाढदिवस विशेष

       ....... कुणाल मांजरेकर

आपण ज्या समाजात घडलो, ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही जाणीव ठेऊन समाजात वावरणारी फार थोडी माणस आपल्याला दिसून येतात. अशातलंच सामाजिक क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव म्हणजे प्रख्यात उद्योजक सागर शिवाजीराव वाडकर… ! ९ जुन १९७९ साली मुंबईत जन्मलेल्या सागर वाडकर यांनी उद्योजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. उद्योजक म्हणून नावारूपास येताना सामाजिक दायित्व म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मदत करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला. कोरोना काळात देखील त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला. आज त्यांचा ४४ वा वाढदिवस. यानिमित्ताने त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा थोडक्यात घेतलेला आढावा…

मुंबईत जन्मलेल्या सागर वाडकर यांची कर्मभूमी खरंतर पुणे. पण आपलं मूळ गाव मालवण आणि या मालवणनेच आपल्या वडिलांना म्हणजेच प्रख्यात बांधकाम व्यावसायिक शिवाजीराव वाडकर यांना घडवलं, ही जाणीव ठेऊन मालवणच्या सामाजिक क्षेत्रात सागर वाडकर यांनी आपलं योगदान दिल आहे. सागर यांचे वडील शिवाजीराव वाडकर यांची ओळख मालवणवासियांना वेगळी सांगायची गरज नाही. तळ कोकण म्हणजे खरंतर मागासलेला भाग म्हणून पूर्वीच्या काळी ओळखला जात होता. छोटी छोटी घर ही इकडची ओळख होती. कोकणी माणूस मुंबई, पुण्यात जायचा तेव्हा मोठमोठ्या इमारतींचं वेगळेपण त्याला पाहायला मिळायचं. इकडे फार तर श्रीमंतांचे बंगलेच दिसून येत. अशावेळी मालवण मध्ये पहिलं कॉम्प्लेक्स उभारण्याचं धरिष्ट्य दाखवणारी व्यक्ती म्हणजे शिवाजीराव वाडकर. १९९९-२००० मध्ये भरड – वायरी रस्त्यावर “रामेश्वर कॉम्प्लेक्स” नावाचं पहिल कॉम्प्लेक्स त्यांनी उभारून मालवण सारख्या छोट्या शहराला मोठ्ठ रूप देण्याचा पहिला प्रयत्न केला.

१९७९ च्या ९ जुनला शिवाजीराव यांना सागर यांच्या रूपाने पुत्ररत्न प्राप्त झालं. सागर यांचं दहावी पर्यंतचं शिक्षण पाचगणीला झालं. तर त्यानंतर एस. वाय. पर्यंतच शिक्षण त्यांनी पुण्याला घेतलं. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना त्यांच्या वडिलांचं ऑपरेशन झालं. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांना व्यवसायात लक्ष घालावं लागल. खरंतर दहावी नंतरच वडिलांनी स्वतःच्या कन्स्ट्रक्शन साईट ची जबाबदारी सागर यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे लहान वयातच व्यवसायचं बाळकडू त्यांना मिळालं होतं. पण एस. वाय. नंतर संपूर्ण व्यवसायाचा डोलारा त्यांच्यावर आला. पण त्यांनी मागे न हटता वडिलांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली. वाडकर कुटुंबियांना पैशाची कमी नव्हती. पण पैशाचं महत्व सागर यांनाही समजावं म्हणून शिवाजीराव यांनी सागर यांना स्वतःच्या खर्चासाठी स्वतः मेहनत करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तीन वर्ष नोकरी करून त्यांनी अकरावी ते एफ वाय चं शिक्षण घेतलं. वडिलांची ऑपरेशन नंतर तब्बेत सुधारल्यानंतर सागर यांनी नाईट कॉलेज करून “डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेट” चं शिक्षण पूर्ण केलं.

१९९९ मध्ये सागर यांनी अँपटेक लिमिटेडची फ्रेंचायसी घेतली. यावेळी आशिया खंडातील सर्वात तरुण बिझनेस पार्टनर म्हणून त्यांना गौरवण्यात आले. २००२ पर्यंत त्यांनी हा व्यवसाय केला. त्यानंतर वडिलांच्या व्यवसायात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. शिवाजीराव यांची पुण्यात १९८२ पासून मार्बल ग्रेनाईटची फॅक्टरी आहे. याठिकाणी सागर रुजू झाले. त्यानंतर पुणे आणि मालवण मध्ये बांधकामाच्या साईट त्यांनी सुरु केल्या.

मागील काही वर्ष सातत्याने व्यवसायाच्या निमित्ताने मालवणशी संपर्कात आलेल्या सागर यांनी व्यवसाया बरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आपले मोठे योगदान दिले आहे. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, निराधारांना मदत असे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी दिलेल्या योगदाना बद्दल आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. सागर यांना पत्नी सौ. प्रीती वाडकर आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा ग्रंथ वाडकर हा अलीकडेच डॉक्टर झाला असून मुलगी कु. विभावरी ही बारावी मध्ये शिकत आहे. वडील शिवाजीराव यांचे २०२० मध्ये निधन झाल्यावर आपल्या व्यवसायचा डोलारा सागर यांनी समर्थपणे सांभाळला आहे. आगामी काळात देखील त्यांच्या हातून समाजसेवेचा घेतलेला वसा अखंडपणे चालू राहो, याचं सदिच्छांसह त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा….

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!