मालवण भरड परिसरात विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान …

युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई व नागरिकांची सामाजिक बांधिलकी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण भरड येथील निर्मिती नर्सरी नजीकच्या बिल्डिंग बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या विहिरीत गाय पडल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या गायीला युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई व इतर नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढून तिला जीवदान देण्यात आले.

सदर विहिरीत गाय पडल्याचे तेथील कॉन्ट्रॅक्टर निलेश नाईक यांच्या निदर्शनास आले. सुदैवाने विहिरीत पाणी कमी असल्याने गाय पाण्यात उभी राहिली होती. त्यांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र अमेय देसाई यांना संपर्क साधून कळविले. यावेळी जवळच आपल्या कामाच्या ठिकाणी असणारे अमेय देसाई हे आपल्या दोन कामगारांसह तात्काळ त्याठिकाणी हजर झाले. महेश ठाकूर व शशिकांत लुडबे यांनी विहिरीत उतरून गायीला दोरीच्या साहाय्याने बांधले. त्यानंतर स्थानिक नागरिकांना पाचारण करीत त्यांच्या मदतीने दोऱ्या ओढून गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात गायीला कोणतीही इजा झाली नाही. गाय बाहेर आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावेळी निलेश नाईक, विद्याधर मेस्त्री, विनायक रेडकर, आगोस्तीन (मधलो) डिसोजा, भूषण मेतर व इतर नागरिकांचे सहकार्य लाभले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!