भाजप नेते निलेश राणेंकडून म्हाडगूत, सरकारे, मांजरेकर कुटुंबियांचे सांत्वन

मालवण : भाजपचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणेंनी शुक्रवारी माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, नगरसेविका पूजा सरकारे यांच्यासह नितीन मांजरेकर आणि दिवंगत प्रदीप मांजरेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.


माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगूत आणि छायाचित्रकार समीर म्हाडगूत यांच्या वडिलांचे अलीकडेच निधन झाले होते. तसेच भाजप नगरसेविका पूजा प्रसाद सरकारे यांच्या सासऱ्यांचे देखील निधन झाले होते. या दोन्ही कुटुंबियांची निलेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. वायरी गावकरवाडा येथील नितीन मांजरेकर यांच्या वडिलांचे निधन झाल्याच्या निमित्ताने या कुटूंबाची देखील त्यानी भेट घेतली. तर भाई मांजरेकर यांचे चूलत भाऊ प्रदीप मांजरेकर यांचे अलीकडेच जिल्हा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाल्याने निलेश राणे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर, नगरसेवक गणेश कुशे, बाबा परब, महेश मांजरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!