…. अन्यथा हिंदुस्थानचे पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही ; भाजपा नेते दत्ता सामंत यांनी व्यक्त केली भीती !
भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या माध्यमातून मालवणात “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे प्रक्षेपण
प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने “दी केरला स्टोरी” चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं : डॉ. मिलिंद कुलकर्णी यांचं आवाहन
दुपारी ३ वा. आणि सायंकाळी ७ वा. मामा वरेरकर नाट्यगृहात “शो” चे पुन्हा प्रक्षेपण
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते आणि दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या चित्रपटात जे दाखवण्यात आलं आहे, ते आपल्या घरात, आपल्या कुटुंबातही घडू शकतं. त्यामुळे आपल्या धर्माचं रक्षण आपणच करायला हवं, नाहीतर हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती दत्ता सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही, पण स्वतःच्या धर्मावरील आक्रमणं मोडून काढली. हा आपला इतिहास आहे. त्यामुळे महाराजांचा इतिहास प्रत्येकाने वाचला पाहिजे. आपल्याला कुठल्याही धर्माचा द्वेष करायला शिकवलं नाही. पण आपल्या धर्मावरील आक्रमणं आपण रोखू शकलो नाही तर आपल्या एवढा दुबळा माणूस कोण नाही. त्यामुळे प्रत्येक मुलीने, तिच्या बापाने हा चित्रपट पाहून धर्मांतराच्या घटनांपासून सावध राहावं, असं आवाहन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केलं.
मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात रविवारी दिवसभरात भाजपच्या माध्यमातून “दी केरला स्टोरी” चित्रपटाचे तीन शो दाखवले जाणार आहेत. पहिल्या शो चे उदघाट्न डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते आणि दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. मिलींद कुलकर्णी, दत्ता सामंत, सुनील धुरी यांनी विचार मांडले. हिंदू धर्माचे रक्षण, सुरू असणारी धर्मांतरे रोखणे, मुलांना आपल्या हिंदू धर्मा बद्दल माहिती देणे, शिकणाऱ्या मुलींनी कसे सावध राहावे याबाबत मार्गदर्शन करताना अन्य धर्माचा द्वेष नाही मात्र हिंदू धर्माचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धर्मांतर म्हणजे नकळत राष्ट्रांतार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांतर केलेल्या अनेकांना त्यावेळी पुन्हा हिंदू धर्मात आणले. याबाबतचे विचार डॉ. कुलकर्णी यांनी मांडले. तर सुनील धुरी यांनी आपल्या जिल्ह्यातही अनेक धर्मांतर प्रकार सुरू असल्याची आकडेवारी सांगितली.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाऊ सामंत, नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पूजा सरकारे, शहर प्रभारी विजय केनवडेकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, विकी तोरसकर, रत्नाकर कोळंबकर, राजू बिडये, मंदार लुडबे, ललित चव्हाण, भाई मांजरेकर, राज कांदळकर यासह अन्य उपस्थित होते.
या चित्रपटाचा दुसरा शो दुपारी ३ वाजता आहे. यावेळी भाजप जेष्ठ पदाधिकारी विलास हडकर व भाऊ सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता तिसऱ्या व अंतिम शोवेळी डॉ. सुभाष दिघे व ऍड. समीर गवाणकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.