जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांची आज कुडाळला बैठक

जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी करणार मार्गदर्शन ; मेळावा नियोजनाबाबत होणार चर्चा

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांची बैठक आज रविवारी ४ जुन रोजी सकाळी १०.३० वा. कुडाळ एमआयडीसी शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे कामगार नेते, मार्गदर्शक तथा जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच शासकीय कॉन्ट्रॅक्टर आरिफ तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

जिल्हामध्ये मागील १० महिन्यात काम करत असताना तीन कामगार मित्रांचे अपघात होऊन त्यांना जीव गमावयाला लागला. तर काही कामगार काम करत असताना शॉक लागून गंभीर जखमी झाले. जिल्ह्यामध्ये कामगारांच्या अपघाताची मालिका कायम सुरूच आहे. असे होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी तसेच कामगारांना काम करत असताना सेफ्टी ट्रेनिंग मिळावी यासाठी जिल्ह्यामध्ये मेळावा आयोजित करण्यासाठी सर्व कामगार सहभागी होऊन मेळाव्याचे नियोजन यावेळी होणार आहे. तरी सर्व कामगारांनी या बैठकीत उपस्थित रहावे. कामगार काम करत असताना त्यांना कामावर अनेक समस्या निर्माण होतात यावर उपाययोजना, कामगारांना पगारवाढ मिळावी, काम करताना सेफ्टी साहित्य मिळावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!