समुद्रात मान्सूनपूर्व हालचालीना सुरुवात ; जलपर्यटन बंदी योग्यच !

ज्येष्ठ पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी मांडली भूमिका

मालवण | कुणाल मांजरेकर

मेरिटाईम बोर्डाने लागू केलेल्या जल पर्यटन बंदी विरोधात पर्यटन व्यवसायिकांतून नाराजीचे सूर व्यक्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी मात्र या बंदीचे समर्थन केले आहे. समुद्रात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे काही दिवसात पावसाला सुरुवात होईल. याचा विचार करता पर्यटन हंगाम बंदीची अंमलबजावणी योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया श्री. तोडणकर यांनी व्यक्त केली आहे.

सागरी किनारपट्टीवर २६ मे पासून जल पर्यटन बंदी लागू करण्यात आली आहे. या बंदी विरोधात पर्यटन व्यवसयिक नाराजी व्यक्त करत आहेत. मात्र श्री. तोडणकर यांनी या बंदीचे समर्थन केले आहे. आता मान्सून पूर्व समुद्रातील अंतर्गत हालचालींना सुरवात होत आहे. हे पाहता २६ मे पासून महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवरील जलक्रीडा व प्रवासी होडी वाहतुकीस असलेली बंदी योग्यच आहे. समुद्रात मान्सून पूर्व हालचालींना साधारण मे अखेरीस सुरवात होते. मात्र काही दिवसांपूर्वी मोचा हे समुद्री वादळ आले होते. ते वादळ ओसरल्यावर काही दिवस समुद्री शांत स्थिती जाणवली. वादळ येऊन गेल्यानंतर ही स्थिती असते. याचा विचार करता समुद्र पूर्णपणे शांत आहे. असे म्हणता येणार नाही. समुद्रातील अंतर्गत हालचाली सुरू होत आहेत. काही दिवसात पावसालाही सुरवात होईल. याचा विचार करता बंदर विभाग व संबंधित यंत्रणानी पर्यटन हंगाम बंदी कालावधीची सुरू केलेली अंमलबजावणी योग्य आहे. आम्हीही आमचे व्यवसाय बंद ठेवले आहेत. अशी भूमिका पर्यटन व्यवसायिक दामोदर तोडणकर यांनी स्पष्ट केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!